आमचा मूळ उद्योग फूड प्रोसेससिंगचे प्लांट उभे करून देणे हा आहे, हे करत असताना डोक्यामध्ये एक संकल्पना आली कि आपण चहामध्ये एखादा ब्रँड उभा करू शकतो.
लोकांचे आरोग्य हा केंद्रबिंदू मानून आम्ही गुळाचा चहा करण्याचे ठरवले. हा ब्रँड सुरु करताना आम्ही एक सिस्टीम कशी उभी राहील याला जास्त प्राधान्य दिले, त्यामुळे हा Business Franchise Concept द्वारेजगभरात पोहोचविण्याचे Mission हाती घेतले. गुळाच्या चहाची वाटचाल २० जुलै २०१९ रोजी चिंचवड स्टेशन पुणेआउटलेट पासून सुरु झाली. त्यानंतर ग्राहकाांच्या मिळालेल्या उत्तम प्रतिसादाच्या आधारे त्या आर्थिक वर्षा मध्ये २५ आऊटलेट्स उभे केले.